सर्वोच्च न्यायालयाचा प्रस्तावित निकाल शिंदेच्या विरोधात लागल्यास अथवा त्याअगोदर त्यांनी भाजप-प्रवेश केल्यास, या वर्षीचा १९ जून हा शिंदे-सेनेचा ‘वर्धापनदिन’ शेवटचा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही

शिंदेंकडे सध्याच्या परिस्थितीत ठाणे जिल्हा आणि ‘शिवसेना’ हे नाव सोडल्यास कुठलेच राजकीय भांडवल नाही. मुख्यमंत्री म्हणून त्यांची कामगिरी भाजपच्या प्रभावाखालील मुख्यमंत्री म्हणूनच नावारूपास आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने उद्या शिंदेंच्या विरोधात निकाल दिल्यास त्यांच्याकडे कुठलेच राजकीय भांडवल शिल्लक राहाणार नाही. या परिस्थितीत त्यांना भाजपमध्ये प्रवेश हाच पर्याय शिल्लक राहतो.......